S M L

अखेर आशिष दामलेला अटक

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2015 10:45 PM IST

ashish damale09 जून : बदलापूर आश्रम तोडफोड प्रकरणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले याच्यासह त्याचा साथीदार केवल वर्मा याला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

बदलापूर मधील ईनगावयेथील साई साधना आश्रमाची तोडफोड केल्यानंतर आशिष दामले फरार झाला होता. सदरचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या नंतर घटना समोर आली होती. या घटनेनंतर फरार झालेल्या आशिष दामलेच्या 12 साथीदारांना आतापर्यंत बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे.

सदर प्रकरणी आशिष दामले याला आज उल्हासनगर न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. आशिष दामले आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात धमकावणे आणि घराची तोडफोड करणे तसंच बंदुकीचा धाक दाखवून लुटणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 07:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close