S M L

चिटफंड कंपन्यांचा महाघोटाळा, राज्यात 40 हजार कोटींची लूट !

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2015 10:37 PM IST

चिटफंड कंपन्यांचा महाघोटाळा, राज्यात 40 हजार कोटींची लूट !

09 जून : पश्चिम बंगालसह उत्तरेकडच्या काही राज्यांमध्ये चिटफंड घोटाळा उघड झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. आता महाराष्ट्रातही चिटफंड कंपन्यांनी बेकायदेशीरपणे चार हजार कोटीं रुपयांना गंडा घातल्याची तक्रार भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय.

एकूण 162 चिटफंड कंपन्यांनी बोगस योजनांखाली देशभरातल्या लोकांना फसवून तब्बल 1 लाख कोटी रुपयांची लूट केलीय. त्यातली महाराष्ट्रातलीच रक्कम 4 हजार कोटी रुपयाची आहे, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. त्यांनी या आरोपादाखल सर्व पुरावे आणि कागदपत्र मुख्यमंत्र्यांच्या हवाली केले आहेत.

या प्रकरणाची शहानिशा आधीच झाली असल्याने मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांना दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीला महाराष्ट्र सरकारने गती द्यावी, अशी सूचना यापूर्वीच सेबींने केलीय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत.

सोमय्या यांनी दिलेली यादी

समृद्ध जिवन

साई ट्विकंल ग्रूप

सिट्रस रिसॉर्ट ग्रूप

स्केनीक लँड अँड ग्रूप

मिराह प्रायव्हेट लिमीटेड कंपनी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 07:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close