S M L

पुढच्या वर्षापासून कुणीही दहावी नापास होणार नाही -तावडे

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2015 11:35 PM IST

vinod tawade309 जून : पुढच्या वर्षापासून महाराष्ट्रात कुणीच दहावी नापास होणार नाही असा विश्वास शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलाय. तावडे यांनी हा विश्वास विद्यार्थ्यांच्या हुशारीवर नाही तर नव्या सरकारी धोरणावर दाखवलाय.

तावडे म्हणतात, या पुढे कुणाच्याही दहावीच्या गुणपत्रिकेवर नापास लिहिलेलं नसेल. जे विद्यार्थी परीक्षेत नापास होतील, त्यांचं समोपदेशन केलं जाईल आणि त्यांना कौशल्य विकास करणार्‍या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल.

त्यामुळे अशा मुलांच्या गुणपत्रिकेवर उतीर्ण कौशल्य विकास असा शेरा दिला जाईल अशी माहिती तावडेंनी दिलीय.

विशेष म्हणजे, 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नापास विद्यार्थ्यांची परीक्षा जूनमध्ये घेण्याचे संकेत तावडे यांनी दिले होते. राज्य सरकारकडेही हा प्रस्ताव विचारधीन आहे.त्यातच तावडे यांनी आज विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 11:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close