S M L

शाब्बास सविता, धुणीभांडी करूनही दहावीत मिळवले 90 टक्के गूण !

Sachin Salve | Updated On: Jun 10, 2015 06:58 PM IST

शाब्बास सविता, धुणीभांडी करूनही दहावीत मिळवले 90 टक्के गूण !

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

09 जून : दहावीच्या परीक्षेत सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून यश संपादन केलय..औरंगाबादेतील सविता जगतापनं धुणीभांडी करून गुणवत्ता मिळवलीय. खास करून महानगर पालिकेच्या शाळेत कोणत्याही महागड्या ट्युशन शिवाय तीनं हे यश मिळवत किमया घडवलीय..सविताची ही संघर्ष

सविता जगताप ही सर्वसामान्य कुटुंबातली झोपडपट्टीत राहणारी विद्यार्थीनी. सविताला दहावीच्या परीक्षेत 90 टक्के मार्क मिळालेत. सविताची आई कविताबाई अशिक्षित आहे. पण तिने धुणीभांडी करत सविताला शिक्षणाबद्दल चिकाटीचे धडे दिले. आई आजारी असते. तिला घरकाम होत नाही म्हणून सवितासुद्धा धुणीभांडी करते. सविताचे वडील संजय जगताप हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करतात.

घर चालवण्यासाठी पैसे कमावण्याच्या प्रयत्नात सविताच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. पण आता तिच्या

शिक्षणासाठी जास्त मेहनत घ्यायचं तिच्या वडिलांनी ठरवलंय.

सविताच्या आईवडिलांकडे तिच्या ट्यूशनसाठी पैसे नव्हते. पण ट्युशन नसेल तरी काही बिघडत नाही, असं सवितानं ठरवलं आणि कसून अभ्यास केला. प्रसंगी उपाशी राहूनही ती शाळेत गेली. सविता ज्यांच्याकडे घरकाम करते त्यांनाही तिच्या यशाबद्दल आनंद झालाय.परीक्षेच्या काळात त्यांनीही सविताला घरकामात सूट दिली.

सविताचे शिक्षणाबद्दलचे इरादे बुलंद आहेत आणि ज्यांचे इरादे बुलंद असतात त्यांना परिस्थितीही थांबवू शकत नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 08:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close