S M L

बिनव्याजी पॅकेजमधून साखर उद्योग सावरणार नाही -पाटील

Sachin Salve | Updated On: Jun 10, 2015 07:24 PM IST

बिनव्याजी पॅकेजमधून साखर उद्योग सावरणार नाही -पाटील

raghunath dada patil410 जून : केंद्र सरकारनं देशातल्या साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्जाचं पॅकेज देऊ केलं असलं तरी या पॅकेजमधून साखर उद्योग सावरणार नाही अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलीय.

एफआरपीच्या मागणीसाठी आज कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटनेनं सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती तरीही मोर्चा काढल्यानं हा मोर्चा पोलिसांनी बिंदू चौकात अडवून संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

साखर कारखानदार 14 हजार कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यामुळं ही रक्कम मिळावी अशी मागणी करत केंद्राच्या पॅकेजमधील किती रक्कम महाराष्ट्राच्या वाट्याला येणार असा सवालही रघुनाथदादा पाटील यांनी केलाय. तसंच एफआरपीचा हा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2015 07:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close