S M L

...तर अजित पवारांना अटक होईल -चंद्रकांत पाटील

Sachin Salve | Updated On: Jun 10, 2015 08:55 PM IST

...तर अजित पवारांना अटक होईल -चंद्रकांत पाटील

10 जून : भुजबळ असो, अजित पवार असो की, भाजपचा नेता, सर्वांवर सारख्याच न्यायाने होणार कारवाई होणार असा इशारा राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. जर अजित पवार सिंचन घोटाळ्यात दोषी आढळले तर अटक होईल असं पाटील म्हणाले. भाजप कुणावरही सुडाने कारवाई करत नाही. कायदेशीररित्याच कारवाई केली जात आहे असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटील म्हणतात, कुणाच्या विरोधात सुडाने वागावं अशी संस्कृती भाजपची नाही. त्यामुळे अशी कोणतीही कारवाई आम्ही केलेली नाही. जर एखाद्या प्रकरणात कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली जाईल. जर दोषी असले अथवा नसले याचा निर्णय कोर्टात होईलच असंही पाटील म्हणाले. भुजबळ यांच्यावर सुरू असलेली कारवाई कायद्याने सुरू आहे. जर भुजबळ दोषी असतील त्यांना सामान्य माणसासारखे तुरुंगात जावे लागेल. जो न्याय भुजबळांना तोच न्याय अजित पवार यांनाही लागू आहे. सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्यात पवार दोषी आढळले तर अटक होईल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2015 08:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close