S M L

बबनराव लोणीकर यांची शैक्षणिक पात्रता वादात!

Samruddha Bhambure | Updated On: Jun 11, 2015 12:28 PM IST

 बबनराव लोणीकर यांची शैक्षणिक पात्रता वादात!

11  जून : दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांचं बोगस डिग्रीचे प्रकरण गाजत असताना महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचीही शैक्षणिक पात्रता आता वादात सापडली आहे. लोणीकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील शैक्षणिक पात्रतेची खोटी माहीती दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तसंच लोणीकर यांनी जनतेची फसवणूक केलीय त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

परतूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले लोणीकर यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयी वेगवेगळी माहिती नमूद केलेली दिसते. 2004 आणि 2009 च्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए प्रथम वर्ष केल्याचे म्हटलं होतं. पण, 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपण केवळ पाचवी उत्तीर्ण असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

याआधीच्या निवडणुकीत पदवीधर असलेले लोणीकर नंतरच्या निवडणुकीत केवळ पाचवी उतीर्ण कसे, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. विशेष म्हणजे, लोणीकर यांनी आपल्या वेबसाईटवर ते बीए असल्याची आणखी माहिती दिली आहे. लोणीकर यांनी जनतेची फसवणूक केलीय त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2015 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close