S M L

लोणीकरांच्या कागदपत्रांची चौकशी करणार -दानवे

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2015 04:26 PM IST

danve_on_fir11 जून : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर प्रकरणाच्या कागदपत्रांची चौकशी करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी दिली आहे.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणीकरांची पाठराखण केलीये. लोणीकरांनी योग्य ते स्पष्टीकरण दिलंय असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.

बोगस डिग्री प्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर जेलमध्ये गेले. हे प्रकरण ताजे असताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना शैक्षणिक पात्रतेची खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.

2004 आणि 2009 च्या प्रतिज्ञापत्रात बी.ए. प्रथम वर्ष लोणीकरांनी नमुद केलं होतं. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पाचवी पास असल्याची शैक्षणिक माहिती नमुद केल्याचा आरोप सावंत यांनी केलाय. या प्रकरणी लोणीकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही सावंत यांनी केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2015 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close