S M L

चाहत्याला थप्पड लगावल्या प्रकरणी मिकाला अटक आणि जामीन

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2015 05:14 PM IST

चाहत्याला थप्पड लगावल्या प्रकरणी मिकाला अटक आणि जामीन

11 जून : आपल्या चाहत्याला कानशिलात लगावल्या प्रकरणी गायक मिका सिंगला अटक करण्यात आली आणि जामीनही देण्यात आलाय. मिका सिंगवर एका डॉक्टराने भर कार्यक्रमात थप्पड लगावल्याचा आरोप केलाय.

मागील महिन्यात 11 एप्रिल रोजी पुसा संस्थानमध्ये एका लाईव्ह इव्हेंटमध्ये मिका सिंग परफॉर्मन्स करत होता. मिका सिंगला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. मिका सिंग गाणं गात असताना एक व्यक्तीने स्टेजवर चढून मिकाशी हस्तादोलन करण्याचा प्रयत्न केला. पण, अचानक स्टेजवर चढलेल्या चाहत्यामुळे मिका संतापला आणि त्याने त्याच्या कानशिलात लगावून दिली. त्याचवेळी मिकाच्या रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं आणि मारहाणही केली.

श्रीकांत असं या व्यक्तीचं नाव असून पेशाने तो डॉक्टर आहे. आपल्यासोबत झालेल्या प्रकारमुळे श्रीकांत यांनी इंद्रपुरी पोलीस स्टेशनमध्ये मिका सिंग विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिका सिंगला हजर राहण्यासाठी वेळोवेळी समन्स बजावली होती. पण, मिकाने त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आज दुपारी मिकाला अटक करण्यात आली आणि जातमुचलक्यावर जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र, मिका सिंगने त्या डॉक्टरांनेच महिलेची छेड काढली होती असा आरोप केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2015 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close