S M L

फक्त आश्वासनांचा पाऊस पण, बळीराजाचे हात कोरडेच !

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2015 09:15 PM IST

farmer suicideसिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

11 जून : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जाचं पुनर्रगठन करून नवीन कर्जाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांना बँका शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळटाळ करीत आहेत. पाऊस झाला वातावरण पेरणी योग्य झालाय. पण, हातात पैसा नसल्यानं शेतकरी पुरता हतबल झालाय. शरद पवार यांच्या कर्जमाफीची मागणी आणि मुख्यमंत्र्यांच्या कर्जाचं पुनर्रगठणाचं आश्वासन पोकळ असल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येतोय.

सांजखेड्याचे शेतकरी भाऊसाहेब भालेराव..भाऊसाहेबांच्या दोन एकर जमिनीवर बँकेच्या कर्जाचा बोजा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कर्जाच्या पुनर्रगठणाच्या आश्वसानामुळं भाऊसाहेबांना वाटलं,आता पेरणी पुरतं कर्ज मिळेल...त्यांनी बँकेत कर्जाची मागणी केली. बँकेनं कर्ज देण्यास नकार दिला. नातेवाईकांनीही पाठ फिरवली. त्यामुळे आता पेरणी कशी करावी या चिंतेत भाऊसाहेब आहेत.

चिते पिंपळगावचे शेतकरी लक्ष्मण गुणावत यांची तर बँकेच्या चुकीमुळं गोची झालीय. लक्ष्मण यांच्या सातबार्‍यावर कर्ज घेतलेले नसतांना एक लाखाचं कर्ज चढवलंय. बँकेच्या बोजापत्रानूसार तलाठ्यानं सातबार्‍यावर एक लाखाचा बोजा लावला. बँकेच्या एक लाखाच्या

भरवश्यावर लक्ष्मण यांनी इतर कर्ज केलं आणि बँकेनं कर्ज दिलेच नाही. हातात पैसे आले नाही. खाजगी कर्ज डोक्यावर चढले आणि आता चुकीच्या बोजामुळं कर्ज मिळत नाही अशा विचित्र अवस्थेत त्यांना दोन वर्ष शेती पडीक ठेवावी लागली.

शेतकर्‍यांच्या कर्ज पुनर्रगठाणाचे आदेश अजून मिळालेले नाहीत. त्यामुळं शेतकर्‍यांना कर्ज देता येत नाही अशी बँकेची भूमिका आहे.विरोधी आणि सत्ताधारी केवळ शेतकर्‍यांना मुर्खात काढतायेत. प्रशासन आणि मुख्यमंत्री यांच्या खेळात शेतकरी हतबल झालाय.

शेतकर्‍यांच्या दुष्काळी परिस्थितीवर आजपर्यंत केवळ राजकारण झालं. विरोधी पक्ष नेते येतात शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याच्या गप्पा करतात. सत्ताधारी येतात शेतकर्‍यांना आश्वासनांची पेंड दाखवतात. शेतकर्‍यांची अवस्था जैसे थे...

कर्ज पुनर्गठन म्हणजे काय ?

जुनं कर्ज तसंच ठेवून नवीन कर्ज मिळतं

शेतकर्‍यांवरचं जुनं कर्ज आणि व्याज स्थगित

कर्ज आणि व्याजाचे हप्ते पाडले जातात

पुनर्गठणाच्या कालावधीत कर्ज आणि व्याज फेडण्याची सक्ती नाही

पुनर्गठणाचा कालावधी संपल्यानंतर जुनं कर्ज हप्त्यानं फेडावं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2015 09:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close