S M L

मुंबई आणि ठाणे परिसरात रिमझिम पावसाला सुरूवात

Samruddha Bhambure | Updated On: Jun 12, 2015 10:49 AM IST

मुंबई आणि ठाणे परिसरात रिमझिम पावसाला सुरूवात

12 जून : मुंबई आणि ठाणे परिसरात काल रात्रीपासूनच रिमझिम पावसाला सुरूवात झालेली पहायला मिळत आहे. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला. गेल्या 24 तासात मुंबई शहरात 25.48 मिमी, पूर्व उपनगरात 11.37 मिमी आणि पश्चिम उपनगरात 34.67 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईतील दादर, प्रभादेवी, बोरिवली, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, ठाणे, कल्याण भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. रात्री उशीरा घरी परतणार्‍या मुंबईकरांची या अचानक आलेल्या मुसळधार पावसानं चांगलीच धांदल उडाली. तर आज सकाळपासूनच मुंबईत पुन्हा एकदा ढगांची दाटी झाली आहे.

मुंबईसह रत्नागिरी, सिधुंदुर्ग जिल्ह्यातही काल रात्री काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून पुणे, सिंधुदुर्गात ढंगाची गर्दी होत असली तरी पावसाची प्रतीक्षा मात्र कायम होती. काल पावसाच्या आगमनामुळे कोकणात आता नियमित पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोकणात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. मात्र, किनारपट्टी भागात पावसाला अजूनही जोर नाही.

गेल्या काही दिवसापासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पण अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक कोंडीलाही मुंबईकरांना तोंड द्यावं लागलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2015 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close