S M L

मॅगीला किचनमध्ये प्रवेश नाहीच !, राज्यात बंदी कायम

Sachin Salve | Updated On: Jun 12, 2015 06:32 PM IST

maggi ban in army412 जून : 2 मिनिटांत तयार होणार्‍या चटकदार मॅगीत शिशाचं अतिरिक्त प्रमाण आढळून आल्यामुळे देशभरात ठिकठिकाणी बंदी घालण्यात आलीये. महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी घालण्यात आलीये. या विरोधात नेस्लेनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र, उच्च न्यायालयाने बंदीचा निर्णय कायम ठेवत मॅगीला किचन प्रवेश बंदच ठेवलाय. तसंच मॅगीच्या ब्रँड ऍम्बेसेडरवर कारवाई का करणार ?, असा सवालही उच्च न्यायालयानं विचारला आहे

मॅगीवर देशभरात संक्रांत आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबई, ठाणे, सांगलीत मॅगीचे 15 सॅम्पल घेतले आणि चाचणी घेतली. या चाचणी मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण वेगवेगळं आढळल्यामुळे राज्यात बंदी घालण्यात आली. या विरोधात नेस्ले इंडिया कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. नेस्ले महाराष्ट्रात मॅगीवर बंदी उठवावी अशी याचिका दाखल केली. पण नेस्ले कंपनीला राज्यात दिलासा मिळाला नाहीये. कारण मॅगीवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलीये. मॅगीबाबत संबंधितांनी दोन आठवड्यांत उत्तर द्यावं असा आदेशही उच्च न्यायालयानं दिलेत. तसंच मॅगीच्या ब्रँड ऍम्बेसेडरवर कारवाई का करणार असा सवालही उच्च न्यायालयानं विचारला आहे. यापुढची सुनावणी 30 जूनला होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2015 06:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close