S M L

ईस्टर्न फ्रीवे अपघात : जान्हवी गडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sachin Salve | Updated On: Jun 12, 2015 07:35 PM IST

ईस्टर्न फ्रीवे अपघात : जान्हवी गडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

12 जून :  ईस्टर्न फ्री-वेवर झालेल्या अपघात प्रकरणी अटक केलेल्या जान्हवी गडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. यामुळे आता 26 जूनपर्यंत जान्हवी गडकर कोठडीत राहणार आहे.

मंगळवारी रात्री ईस्टर्न फ्रीवेवर दारू पिऊन बेदरकारपणे बीएम डब्ल्यू कार चालवून जान्हवी गडकरने एका टॅक्सीला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा बळी गेला. जान्हवीला अगोदर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. आपल्याला जामीन मिळालवा यासाठी जान्हवीने हायकोर्टात अर्ज केलाय. त्याची सुनावणी 15 जूनला होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2015 06:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close