S M L

वसई-विरार पालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या, रविवारी मतदान

Sachin Salve | Updated On: Jun 12, 2015 08:50 PM IST

वसई-विरार पालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या, रविवारी मतदान

vasai virar municipal corporation election12 जून : वसई विरार महापालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्यात. येत्या रविवारी 115 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे.

वसईमध्ये 115 प्रभागांसाठी 367 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकुर विरूद्ध इतर सर्व पक्ष असा हा सामना होणार आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.

पण महायुतीच्या भाजप आणि माजी आमदार विवेक पंडित यांचा जनआंदोलन पक्षं प्रमुख प्रतिस्पर्धी असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचार फारसा दिसुन आला नाही. त्यामुळे वसई विरार पालिकेवर झेंडा कोण फडकावतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

वसई विरार महानगरपालिका निवडणूक

एकूण मतदार 06,76,639

एकूण प्रभाग 115

एकूण उमेदवार 367

एकूण मतदान केंद्र 607

संवेदनशील मतदान केंद्र 117

पोलीस बंदोबस्त

एकूण पोलिस कर्मचारी 2000

2 दंगल नियंत्रण पथक

प्रमुख लढत

बहुजन विकास आघाडी आरपीआय (A)

विरुद्ध

शिवसेना, भाजप आणि जनआंदोलन पक्ष

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2015 08:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close