S M L

एमसीए निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2015 01:35 PM IST

mca13 जून : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा आखाडा दिवसेंदिवस रंगत चाललाय. आज निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

क्रिकेट फर्स्ट गटाकडून विजय पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांपुढे अध्यक्षपदासाठी आव्हान निर्माण केलंय. क्रिकेट फर्स्ट गटाला शिवसेनेनं समर्थन दिलंय. शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक आणि खासदार राहुल शेवाळेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर बाळ महाडळकर गटाकडून शरद पवार अध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत.

तर भाजपचे आशिष शेलार यांनीही उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय. आज शेवटच्या दिवशी विजय पाटील आपली उमेदवारी कायम ठेवणार की , अध्यक्षपदाच्या लढतीतून माघार घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2015 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close