S M L

नगरच्या जामखेड तुरुंगातून चार अट्टल दरोडेखोर पळाले

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2015 03:11 PM IST

नगरच्या जामखेड तुरुंगातून चार अट्टल दरोडेखोर पळाले

nagar darodekhor13 जून : अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तुरुंगातून चार अट्टल दरोडेखोर पसार झाल्याची खळबळजनक घटना घडलीये. जेलच्या मागच्या बाजूची कौलं काढून कैदी पळाले. रात्री बारा ते एकच्या सुमाराला ही घडली घटना घडलीय.

जामखेड पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी ज्या बारा गंभीर गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला होता त्याच गुन्ह्यांमध्ये हे आरोपी अटकेत होते.

रात्री जामखेडमध्ये सुरू असलेला पाऊस आणि गायब झालेली वीज याच संधीचा फायदा घेत या आरोपींनी पलायन केलंय.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज देशमुखांनी जामखेड जेलला भेट दिली. पहाटेपासून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2015 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close