S M L

वीज कोसळून एकाच कुटुंबातील 3 जण ठार

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2015 05:52 PM IST

वीज कोसळून एकाच कुटुंबातील 3 जण ठार

dhule lightning strike13 जून : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे परिसरात शुक्रवारी संध्याकाळी अंगावर वीज पडल्यानं एकाच कुटुंबातील तीन मेंढपाळाचा मृत्यू झालाय. तर या दुर्घटनेत अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेला मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडामुळे शेतात गेलेले शेतकरी तसंच शेतमजुरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शेवाडेगाव परिसरातील जंगलात मेंढ्या चारण्यासाठी तान्हू न्हानू ठेलारी, ज्ञानेश्‍वर अर्जुन ठेलारी आणि भटू अर्जन ठेलारी गेले होते. त्यांच्यासह रत्नाबाई भटू माळी,धुडकू लखा ठेलारी आणि भीमा भिवा ठेलारी हेही सोबत होते.

यावेळी मुसळधार पावसात एका झाडाखाली थांबलेल्या ठेलारी मेंढपाळ कुटुंबीयांवर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेततान्हू न्हानू ठेलारी, ज्ञानेश्‍वर अर्जुन ठेलारी आणि भटू अर्जन ठेलारी मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 लहान भावंडाचा देखील समावेश आहे. तर या दुर्घटनेत एका महिलेसह दोन जण जखमी झाले असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मुसळधार पावसात अर्ध्या तासात नद्या नाल्यांना पूर आला. गावाच्या परिसरातच अचानक आलेल्या या पुराने दाणादाण उडाली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2015 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close