S M L

भुजबळांना धक्के पे धक्का, समीर आणि पंकज भुजबळांविरोधात गुन्हा दाखल

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2015 09:41 PM IST

bhujbal family_13 जून : माजी सार्वजनिक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना पुन्हा धक्के पे धक्का बसलाय. हेक्स वर्ल्ड गृह प्रकल्प फसवणूक प्रकरणी पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तळोजा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलीये.

हेक्स वर्ल्ड गृह प्रकल्पाचं काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 40 अधिकार्‍यांना आलिशान घरं मिळाली होती असा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. 2000 फ्लॅटधारकांना आश्वासन देऊनही फ्लॅट देण्यात आले नव्हते.

2000 पासून या जागेवर बांधकामही करण्यात आलं नाही. या प्रकरणात फ्लॅटधारकांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.अखेर या प्रकरणी समीर भुजबळ आणि पकंज भुजबळांविरोधात कलम 420, 406 आणि कलम 34 प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे, आठवड्याभरात भुजबळांविरोधात हा तिसरा एफआयआर दाखल झालाय. छगन भुजबळ यांच्या विरोधात कलिना भूखंड प्रकरण, महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी भुजबळांसह 17 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला यात समीर आणि पकंज भुजबळ यांचाही समावेश आहे.

काय आहेत आरोप ?

- हेक्स वर्ल्ड गृह प्रकल्प फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल

- 2000 फ्लॅटधारकांना आश्वासन देऊनही फ्लॅट न देणं

- 2000 पासून जागेवर बांधकाम न करणं

- आर्थिक फसवणूक करणं

- सर्व संचालकांनी मिळून संगनमतानं गुन्हा करणं

- समीर आणि पंकज भुजबळ यांच्यासह सर्व 5 संचालकांविरूध्द गुन्हा

- फ्लॅटधारकांकडून 8 टक्के रक्कम आगाऊ घेण्यात आली होती

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2015 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close