S M L

राज्य माहिती आयुक्त दीपक देशपांडेंच्या घरावर एसीबीचा छापा

Samruddha Bhambure | Updated On: Jun 14, 2015 08:39 PM IST

maharashtra_sadan

14 जून : औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला. एसीबीने टाकलेल्या छाप्यात एक कोटींचे फिक्स डिपॉझिट, 80 तोळे सोने, दीड किलो चांदी आणि महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आल्याचे कळते.

महाराष्ट्र सदन बांधकाम विभागातील घोटाळ्याप्रकरणी एसीबीने देशपांडेंच्या चेलीपूरा भागातील घरावर हा छापा टाकला. दीपक देशपांडे हे तत्कालीन बांधकाम सचिव होते. सध्या औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत.

दरम्यान, बांधकाम विभगातील घोटाळया प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्हात छगन भुजबळ यांच्यासह दीपक देशपांडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2015 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close