S M L

देशपांडेंच्या घरात कोट्यवधीचे घबाड, एक किलो सोनं, 27 किलो चांदी सापडलं !

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2015 12:03 PM IST

देशपांडेंच्या घरात कोट्यवधीचे घबाड, एक किलो सोनं, 27 किलो चांदी सापडलं !

15 जून : दिल्लीतल्या नव्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने कारवाईचा धडाका सुरू केलाय. त्याचाच भाग म्हणून शनिवारी रात्रीपासून एसीबीने सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अनेक माजी अधिकार्‍यांच्या घरावर छापे टाकले. या घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या अधिकार्‍यांकडे हे छापे टाकण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे आणि देवदत्त मराठे यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधीचं घबाड हाती लागलंय.

दीपक देशपांडेंच्या घरात एक किलो 530 ग्रॅम सोनं, 27 किलो चांदी, 2 कोटी 68 लाखांचे बॉन्ड्स सापडले आहे. एवढंच नाहीतर तीन बँकेतील खात्यांमध्ये 50 लाख सापडले असून आणखी 4 लॉकर्स उघडणे बाकी आहे. देशपांडेंची संपत्ती एवढीच नाही तर ठाणे, औरंगाबाद, पुणे येथे पाच घरं, औरंगाबाद येथे चार भूखंड . नाशिक, औरंगाबाद येथे दोन दुकानं आणि औरंगाबादमध्ये पाच हेक्टर शेतजमीनही आहे. तर देवदत्त मराठे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला त्यात 116 ग्रॅम सोनं आणि 45 लाखांचे बॉन्ड्स सापडले आहे.

 काय सापडले?

दीपक देशपांडे

- ठाणे, औरंगाबाद, पुणे येथे पाच घरं

- औरंगाबाद येथे चार भूखंड

- नाशिक, औरंगाबाद येथे दोन दुकानं

- औरंगाबादमध्ये पाच हेक्टर शेतजमीन

- 2 चारचाकी वाहनं

- एक किलो 530 ग्रॅम सोनं

- 27 किलो चांदी

- 2 कोटी 68 लाख रुपयांचे बॉन्ड्स

- 6360 शेअर्स

- तीन बँक खात्यांत 50 लाख रुपये

- 4 लॉकर्स उघडणे बाकी

देवदत्त मराठे

- नागपूर आणि नवी मुंबईत तीन घरं

- 3 चारचाकी वाहनं

- 116 ग्रॅम सोनं

- 45 लाख रुपयांचे बॉन्ड्स

- एक बँक खातं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2015 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close