S M L

फियानमुळे पिकांचं 100 कोटींचं नुकसान

12 नोव्हेंबर फियान वादळामुळे राज्यातली एकूण 45 टक्के पिकं तडाख्यात सापडली आहेत. अवकाळी पावसामुळे एकूण 100 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज कृषीखात्याने व्यक्त केला आहे. भातासारख्या खरीप पिकासोबतच कांदा, द्राक्ष, डाळींब, केळी, कापूस, आंबा, काजू या नगदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यापैकी नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये 35 ते 40 हजार हेक्टरवरच्या द्राक्ष पिकाचं नुकसान झालं आहे. सांगलीतल्या साडेचार हजार हेक्टरवरच्या डाळींब बागा धोक्यात आल्यात. कोल्हापूरमध्ये भाताचे 60 ते 75 टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर अमरावती आणि लातूर विभागातल्या जिल्ह्यांमध्ये कापसाचं मोठं नुकसान झालंय. पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागात ऊसतोडणीची कामंही थांबलीत. तर कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातल्या आंबा आणि काजूच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. या पावसामुळं द्राक्ष पिकाचं 60 कोटी तर इतर पिकांचे 40 कोटी असे एकूण 100 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2009 09:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2009 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close