S M L

माळशेज घाटात बसवर दरड कोसळून 2 ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 15, 2015 03:06 PM IST

माळशेज घाटात बसवर दरड कोसळून 2 ठार

15 जून : मुरबाड-पुणे मार्गावरील माळशेज घाटात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ही दरड एका प्रवासी बसवर कोसळून, यात 2 जण ठार झाले असून, 45 प्रवासी जखमी झाले आहेत.

विलेपार्ले इथे राहाणारे काही पर्यटक मुंबईहून बस घेऊन माळशेज घाटात पिकनिकसाठी आले होते. माळशेजहून मुंबईला येत असताना बस वर दरड कोसळली आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, माळशेज घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतच असतात.  यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात ही दुर्घटना घडल्यामुळं या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2015 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close