S M L

छगन भुजबळ यांच्याविरोधात किरीट सोमैया आणखी आक्रमक

Samruddha Bhambure | Updated On: Jun 15, 2015 06:08 PM IST

छगन भुजबळ यांच्याविरोधात किरीट सोमैया आणखी आक्रमक

15 जून : एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप मागे लागलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आता आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडे तक्रार केली आहे.

इंडोनेशियातील कोळसा खाणी आणि हवाला कनेक्शन प्रकरणी सोमैया यांनी ही तक्रार केली आहे. भुजबळ आणि हवाला किंग अनिल वस्तावडे यांच्या संबंधांचे तपशीलही किरीट सोमैया यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे जाहीर केले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचं ठरवलं तर भुजबळ आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2015 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close