S M L

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय? नागपूर जेलसमोरून कैदी फरार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 15, 2015 07:21 PM IST

nagpur central jail

15 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे वारंवार धिंडवडे निघत आहेत. गेल्या काही महिन्यात नागपूर सेंट्रल जेलमधून कैद्यांच्या पलायनाच्या घटना समोर येत असताना नागपूर जेलच्या समोरूनच आज आणखी एक कैदी फरार झाला आहे.

पुरुषोत्तम भोयर असं या कैद्याचे नाव आहे. तो एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पुरुषोत्तमला खुल्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी शारीरिक श्रमासाठी पुरुषोत्तमला जेलच्या बाहेर शेतावर आणण्यात आलं असताना तो तिथून पसार झाला.

विशेष म्हणजे याच वर्षी 31 मार्च रोजी नागपूर जेलमधून तब्बल 5 सराईत गुन्हेगार पसार झाले होते. त्यापैकी अजूनही 2 कैद्यांना अटक झालेली नाही. त्यानंतर या जेलमध्ये मोबाईल आणि सिम सापडण्याचे प्रकार घडले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या जेलला भेट दिली होती. तेव्हाही तिथे मोबाईल सापडला होता. आता पुन्हा कैदी फरार झाल्यानं सेंट्रलजेल प्रशासनाचं चालंलंय मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात नक्की चाललंय काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2015 07:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close