S M L

मुजोर रिक्षाचालकांना बसणार चाप?

Samruddha Bhambure | Updated On: Jun 15, 2015 09:35 PM IST

15 जून : Diwakarरिक्षाचालकांना मुजोरीला लवकरच चाप बसणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला आहे. मुजोर रिक्षा चालकांविरोधात 18 विशेष पथकं स्थापन करण्याची माहितीही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

17 जूनला सर्व ऑटो आणि टॅक्सी संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यासाठी परिवहन खातं सज्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच शिवसेना ऑटो टॅक्सी युनियन संपात सहभागी होणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली.

ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संप करू नये. सरकार त्यांच्या मागण्यांवर विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच संपाच्या काळात अतिरिक्त 100 एसटी बसेस सोडण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे, तसंच 'बेस्ट' बसेसही सज्ज ठेवण्यात येतील असं दिवाकर रावते म्हणाले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2015 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close