S M L

भुजबळांचा पाय आणखी खोलात, मुंबई-नाशिकमध्ये घर-कार्यालयांवर छापे

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2015 04:32 PM IST

भुजबळांचा पाय आणखी खोलात, मुंबई-नाशिकमध्ये घर-कार्यालयांवर छापे

16 जून : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याभोवती आता कारवाईचा फास आवळण्यात आलाय. भुजबळांचा मुंबई, नाशिकमधील घरांवर आणि कार्यालयांवर अँटी करप्शन ब्युरोच्या एसआयटी टीमने छापे टाकले आहे.

मुंबई आणि नाशिकमधल्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे. एकाच वेळेस दोन्ही ठिकाणीही कारवाई करण्यात आलीये. मुंबईतील वांद्र्यात भुजबळांच्या एमईटी शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयावर आणि सांताक्रुझमधील घरावर छापा टाकण्यात आलाय. तर नाशिकमध्ये भुजबळ फार्म हाऊस आणि राहत्या घरी छापे टाकण्यात आले आहे.

मागील दोन आठवड्यात भुजबळांविरोधात कलिना सरकारी भूखंड वाटप प्रकरणी आणि महाराष्ट्र सदन प्रकरणी एफआयआर दाखल झाले आहे.त्यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच बड्या अधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर औरंगाबादेत दिपक देशपांडे आणि नागपुरात देवदत्त मराठे यांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. अधिकार्‍यांच्या कारवाई झाल्यामुळे भुजबळांच्या घरावरही छापे टाकले जाण्याची दाट शक्यता होती अखेर आज अँटी करप्शन ब्युरोने धडक कारवाई करत छापे टाकले आहे.

भुजबळांच्या मालमत्तेवर एकूण 16 ठिकाणी छापे पडले

मुंबईत 7 ठिकाणी

ठाणे 2 ठिकाणी

नाशिक 5 ठिकाणी

पुणे 2 ठिकाणी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2015 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close