S M L

सेना सत्तेत आहे ना ?,मग प्रकल्प रद्द करून दाखवा -राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Jun 16, 2015 03:19 PM IST

Raj Thakre

16 जून : मेट्रोसारखे प्रकल्प हे बाहेरुन आलेल्या लोंढ्यांसाठी असून अशा प्रकल्पांची मुंबईकरांना गरज नाही असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. शिवसेना सत्तेत आहे तर प्रकल्प रद्द करून दाखवा, आंदोलनं कसली करतायत असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेला लगावला आहे.

मेट्रो 3 या प्रस्तावित प्रकल्पासाठी दादरमधील काही रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर काही रहिवाश्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मुळावर येणार्‍या प्रकल्पांना आमचा विरोध राहील, असं स्पष्ट केलं.

जो प्रश्न आरे आणि गिरगावमध्ये उभा राहिला तोच प्रश्न आता दादरमध्ये ही उभा राहिला आहे. जिथे तिथे मराठी माणूस आहे आणि तिथेच प्रकल्प राबवले जात आहेत. बाहेरून आलेल्या लोकांच्या सुखासाठी हे प्रकल्प केले जात आहेत. पण मुंबईकरांना अशा प्रकल्पांची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचेच प्रकल्प जर तुम्ही पुढे नेत असाल तर मग तुमची गरजच काय ?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसंत शिसेनेला जर सत्तेत आहे तर त्यांना आंदोलन करायची काय गरज, त्यांनी सरळ प्रकल्प रद्द करायला हवा. पण शिवसेनेलाही त्यांची भूमिका कळत नाहीये. त्यात भाजप त्यांना किती महत्त्व देते हा सुद्धा प्रश्नच आहे, असा खोचक टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री मेट्रो तीन प्रकल्पावर ठाम असून मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मेट्रो तीन प्रकल्प होणारच असं स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2015 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close