S M L

अखेर स्कूल बसना मिळाली टोलमुक्ती!

Samruddha Bhambure | Updated On: Jun 16, 2015 04:24 PM IST

अखेर स्कूल बसना मिळाली टोलमुक्ती!

16 जून : राज्यातील टोल नाक्यांवर लहान वाहनांसह एसटी बस आणि स्कूल बसनाही टोलमाफी देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेऊनही टोलनाक्यांवर स्कूल बसकडून टोलवसूली केली जात होती. अखेर राज्य सरकारने टोल सवलतीबाबत नावीन जीआर जारी केला असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी सही ही केली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पण, ज्या 52 टोलनाक्यांवर लहान वाहनांाना सूट आहे केवळ त्याच टोलनाक्यांवर स्कूल बसनाही सवलत देण्यात आली आहे असंही त्यांनी नमुद केलं. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्यातील 12 टोल नाके कायमचे बंद करण्याबरोबर अन्य 52 टोल नाक्यांवर लहान वाहनं तसंच एसटीला आणि स्कूल बसला टोलमधून वगळण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार 1 जूनपासून बहुतांश टोल नाक्यांवर एसटी आणि हलक्या वाहनांकडून होणारी टोल आकारणी बंद झाली. पण, स्कूल बसेसच्या संदर्भात निर्णय होऊनही काही टोलनाक्यांवर स्कूल बसेसकडून टोलवसूली सुरूच होती. त्याविरोधात राज्यभरातील स्कूल बसचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर सरकारने सुधारित जीआर काढून त्यात स्कूल बसचा उल्लेख केल्याने यापुढे स्कूल बसना या टोल नाक्यातून सूट मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2015 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close