S M L

'ते' निर्णय माझे एकट्याचे नसून मंत्रिमंडळाचे - छगन भुजबळ

Samruddha Bhambure | Updated On: Jun 16, 2015 07:20 PM IST

Chagan Bhujbal

16 जून : अँटी करप्शन ब्युरोकडून ज्या कारणांसाठी माझी चौकशी करण्यात येत आहे. ते निर्णय मी एकट्याने घेतलेले नाहीत. प्रशासकीय मान्यतेनंतर मंत्रिमंडळाच्या संमतीने ते निर्णय घेण्यात आलं असल्याचं राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी सांगितलं. अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकार्‍यांनी छगन भुजबळ यांच्या मुंबई, नाशिक, पुणे, मनमाड आणि येवला येथील घरांवर आणि कार्यालयांवर मंगळवारी छापे टाकले. त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी आपण पदाचा कसलाही गैरवापर केला नसल्याचं सांगितलं.

अँटी करप्शन ब्युरोकडून सुरू असलेल्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करतो आहोत. मात्र, ज्या कारणांसाठी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते निर्णय महिन्या दोन महिन्यांत घेतलेले नाहीत. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या संमतीनंतर मंत्रिमंडळाच्या संमतीने पूर्ण विचाराने ते घेण्यात आले आहेत. पण, आता त्यासाठी मला जबाबदार धरून चौकशी करण्यात येत आहे. माध्यमांमध्ये आमच्या कुटुंबाच्या मालमत्तेसंदर्भात जी चर्चा सुरू आहे ती निरर्थक आहे. अनेक घरं आम्हाला वारसाहक्काने मिळाली आहेत, असंही त्यांनी सांगितलं. पक्ष आपल्या पाठीशी असून आपण या प्रकरणी कायदेशीर लढा देणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2015 07:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close