S M L

पंतप्रधानांनी ट्विट करून दिल्या नवाझ शरीफना रमझान महिन्याच्या शुभेच्छा

Samruddha Bhambure | Updated On: Jun 16, 2015 10:32 PM IST

223narendra modi and nawaz sharif

16 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष मोहम्मद अशरफ घानी यांना रमझाननिमित्त शुभेच्छा दिल्या आहे.पंतप्रधानांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. 18 तारखेला रमझान महिना सुरू होतं आहे. रमजान महिन्यात भारत पाकिस्तानच्या मच्छिमारांना सोडणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. पाकिस्तानसोबत चांगले संबंध राहावेत हीच शरीफ यांची इच्छा असल्याचं मोदींनी म्हटलं. राष्ट्रप्रमुख हे कुटुंबप्रमुखासारखे असतात, देशवासीयांना त्यांनी शांत आणि समृद्ध जीवन देणं गरजेचं आहे. हेच ध्येय गाठण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्ताननं एकत्र प्रयत्न केले पाहिजेत असंही शरीफ यांनी म्हटल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2015 08:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close