S M L

नगररचनाकार हरपला, चार्ल्स कोरिआ यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Jun 17, 2015 11:46 AM IST

नगररचनाकार हरपला, चार्ल्स कोरिआ यांचं निधन

17 जून : जगविख्यात वास्तुविशारद आणि नगररचनाकार चार्ल्स कोरिआ यांचं आज (बुधवारी) निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आधुनिक शहरांचा विकास त्यांनी केला. त्यांनी ज्या वास्तुंची रचना केली, त्यामध्ये आधुनिकतेबरोबरच स्थानिक परंपरेचा आवर्जून वापर बघायला मिळतो.

साबरमतीचं महात्मा गांधी स्मारक संग्रहालय, गोव्यातील कला अकादमी, भोपाळमधील भारत भवन अशा अनेक वास्तूंचं कल्पक डिझाईन हे चार्ल्स कोरिआ यांचंच आहे. मुंबईसारख्या चहूबाजूंनी वाढणार्‍या शहराला जेव्हा जुळ्या शहराची गरज निर्माण झाली, तेव्हा नवी मुंबईची कल्पना पुढे आली.

आताचं नवी मुंबई शहर वसवण्यात आणि या शहराची सुनियोजित रचना हीसुद्धा चार्ल्स कोरिआ यांनी केलेली आहे. जयपुरमधलं जवाहर कला केंद्र, दिल्लीतील ब्रिटीश कौन्सिल, कोलकात्यामधील सिटी सेंटर, मध्यप्रदेशची विधान भवन इमारत अशा अनेक मोठमोठ्या वास्तू चार्ल्स कोरिआ यांनी घडवल्या आहेत. केरळमध्ये चार्ल्स कोरिआ यांच्या कल्पनेतून साकारलेली लो इन्कम हाऊसिंगची योजना देशभरात गाजली होती.

1972 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं आणि 2006 साली पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. जगभरातही अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. नुकतंच त्यांनी टोरांटोमधील ईस्माईली सेंटर आणि बोस्टनमधलं ब्रेन सायन्स सेंटरचं कामही पूर्ण केलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2015 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close