S M L

भुजबळांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ठ, आता ईडीही करणार चौकशी

Sachin Salve | Updated On: Jun 17, 2015 01:18 PM IST

bhujbal_nashik_mumbai_acb17 जून : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ चौकशीच्या फेर्‍यात चांगलेच अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यानंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालय सुद्धा भुजबळांची चौकशी करणार आहे. भुजबळ यांच्याविरोधात ईडीने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तक्रार दाखल केलीये. भुजबळांसह पुतण्या समीर भुजबळ आणि मुलगा पंकज भुजबळ यांच्यावरही तक्रार दाखल करण्यात आलीय.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह इतर 11 वेगवेगळ्या प्रकरणात मंगळवारी एसीबीने हायकोर्टांच्या आदेशानुसार भुजबळ कुटुबियांशी संबंधीत तब्बल 16 मालमत्तांवर छापे टाकले आहे. भुजबळांच्या नाशिक, मुंबई, पुण्यातील घर आणि ऑफिसेसवर छापे टाकण्यात आले आहे.

या छाप्यात भुजबळांची तब्बल 2,563 कोटींची मालमत्ता उजेडात आलीये. एसीबीकडून चौकशी अजूनही सुरूच आहे. भुजबळ यांनी आपण कोणतीही लाच घेतली नाही. आपल्याविरोधात सरकार सुडबुद्धीने कारवाई करत आहे असा दावा भुजबळांनी केलाय.

पण, भुजबळ जर दोषी आढळले तर अटकेची कारवाई होऊ शकते. आता, याच प्रकरणात ईडीनेही उडी घेतलीये. ईडीने भुजबळांविरोधात तक्रार दाखल केलीये. त्यामुळे भुजबळांची चांगलीच गोची झालीये. एसीबीच्या चौकशीतून भुजबळ सही सलामत सुटले तर ईडीचा फेर्‍यात अडकतील हे आता निश्चित झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2015 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close