S M L

एसीबीच्या कात्रीत सापडलेले छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

Samruddha Bhambure | Updated On: Jun 18, 2015 04:47 PM IST

एसीबीच्या कात्रीत सापडलेले छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

18 जून : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी गोत्यात आलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सिल्वर ओक बंगल्यावर छगन भुजबळ यांनी आज सकाळी शरद पवारांशी जवळपास 20 मिनिटे चर्चा केली.

गेल्या दोन दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडून भुजबळ यांच्या संपत्तीची झडती घेण्याचं काम सुरू आहे. या तपासात भुजबळ यांची करोडोंची संपत्ती असल्याचं उघडकीस आलं आहे. त्याचबरोबर ईडीनेही भुजबळ यांच्या विरोधात काल नवे गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व घडामोडींनंतर भुजबळांनी पहिल्यांदाच पवारांची भेट घेतली. विशेष म्हणजे, काल माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी आपल्याला पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचा दावा केला होता. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन बाळगल्याने भुजबळांना राष्ट्रवादीने वार्‍यावर सोडल्याचेही बोलले जात होतं.

दरम्यान शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ यांनी याबाबत बोलणं टाळलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2015 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close