S M L

भुजबळांसाठी काँग्रेसही सरसावली, भाजप एसीबीकडून आपल्याच नेत्यांना वाचवतेय

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2015 07:33 PM IST

भुजबळांसाठी काँग्रेसही सरसावली, भाजप एसीबीकडून आपल्याच नेत्यांना वाचवतेय

18 जून : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ एसीबीच्या जाळ्यात अडकल्यामुळे चांगलेच अडचणीत आले. भुजबळांचा पाठराखण करण्यासाठी एकेकाळचा मित्रपक्षही धावून आलाय. छगन भुजबळांच्या विरोधातली चौकशीचे तपशिल मीडियामध्ये जाहीर करायचे आणि दुसरीकडे भाजप सरकार आपल्या नेत्यांविरोधातल्या चौकशांमध्ये अडथळा आणायचा असा प्रकार सध्या सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला 100 कोटी लाच देण्याचा प्रयत्न झाला असं जाहीर विधान केलं होतं, त्यांनी लाच

देणार्‍यांची नावं उघड करावी, यासंबंधीची तक्रार 9 महिन्यांपूर्वीच एसीबीकडे केली होती, त्याची चौकशी मात्र एसीबी करत नाही असा आरोपही सावंत यांनी केलाय.

तसंच एसीबीच्या चौकशीच्या भीतीनं भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्याही चौकशी पुढे सरकत नाही, हा दुजाभाव आहे नाहीतर काय आहे. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असा सवालही सावंत यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ जलसंपदा खात्यातल्या भ्रष्टाचाराचीही एसीबीकडून चौकशी केली जाईल असा इशारा जलसंपदा

मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय. केवळ भुजबळांची चौकशी केली जातेय असं म्हणणं चुकीचं ठरेल, असंही महाजन म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2015 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close