S M L

पावसाचा एपीएमसी मार्केटलाही फटका, फळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2015 02:23 PM IST

पावसाचा एपीएमसी मार्केटलाही फटका, फळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

20 जून : मुंबईत शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका एपीएमसी मार्केटलाही बसलाय. फळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे कलिंगड़ पपई, खरबूजाचं प्रचंड नुकसान झालंय. कालच्या मुसळधार पावसामुळे 400 गाड्या मार्केट मध्येच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे अंदाजे 70 लाखांचं नुकसान झालंय.

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज या पावसाचा परिणाम फळांवर देखील झाला नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळ मार्केटमध्ये 800 गाड्यांची आवक झाली. मात्र, मालाला विक्री नसल्याने कलिंगड़ पपई, खरबुज यांचं प्रचंड नुकसान झालंय. रमजान महीना सुरू झाल्याने याची मागणी प्रचंड असली तरी विक्री नसल्याने हा सर्व माल मार्केटमध्येच आहे. मात्र, यात व्यापर्‍यांचं अंदाजे 70 लाख रुपयांचं नुकसान झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2015 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close