S M L

राहुल गांधी भेटलेल्या 9 शेतकर्‍यांचं काँग्रेसने कर्ज फेडलं

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2015 05:56 PM IST

राहुल गांधी भेटलेल्या 9 शेतकर्‍यांचं काँग्रेसने कर्ज फेडलं

20 जून : अमरावती जिल्ह्यातल्या कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या 9 शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळालाय. या 8 कुटुंबांवर असलेल्या कर्जाची एकूण 5 लाख 37 हजार 500 रुपयाची रक्कम अमरावती जिल्हा काँग्रेसने कमिटीने भरली आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीच्या वाढदिवसानिमित्त या शेतकर्‍यांना ही भेट देण्यात आली. काँग्रेस कमिटीने या 9 कुटुंबांना वर्षभरासाठी दत्तकही घेतलंय. राहुल गांधी अमरावती दौर्‍यावर आले असताना त्यांनी या कुटुंबांची भेट घेतली होती.

राहुल गांधी यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व चांदुर रेल्वे तालुक्यातील आत्महत्याग्रस्त 9 शेतकर्‍यांच्या कुंटुबियांची भेट घेतली होती. यात निलेश वाळके, अंबादास वहीले, किशोर कांबळे, कचरू तुपसुंदरे, मारोती नेवारे, माणिक ठवकर, रामदास अडिकणे, शंकर अडिकणे, अशोक सातपैसे या आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त या शेतकर्‍यांच्या कर्ज फेडल्याचं विरेंद्र जगताप यांनी सांगितलं. या 9 आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांचे कर्ज काँग्रेसने निल केल्याने आता त्यांचे कुटुंबीय नव्याने कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत. त्यामुळे या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2015 05:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close