S M L

मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणात भ्रष्टाचाराचे रॅकेट, एका लाचखोराला अटक

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2015 07:24 PM IST

mumbai goa highway420 जून : मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणासाठी होणार्‍या भूसंपादनात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि हायवे ऑथॉरिटीच्या अधिकार्‍यांचे भ्रष्टाचाराचे रॅकेट असल्याचं पुढे आलंय. या प्रकरणी एकाला 10 हजारांची लाच घेताना सीबीआयनं रंगेहाथ पकडलंय.

सिंधुदुर्गातल्या रमाली इन हॉटेलचे मालक द्वारकानाथ डिचोलकर यांनी हायवेसाठी करण्यात येणारा सर्व्हिस रोड आपल्या हॉटेल समोरून नेण्यात यावा अशी विनंती करताच, आराखड्यात बदल करण्यासाठी डिचोलकर यांच्याकडे साडेपाच लाखांची लाच मागण्यात आली.

डिचोलकर यांनी सीबीआयकडे तक्रार करताच दत्तात्रय धडाम या एजंटाला या रकमेपैकी दहा हजाराची लाच घेताना सीबीआयच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडलंय. धडामला 22 तारेखपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सीबीआयचे अधिकारी पुढील तपास करतायत. मात्र, यामुळे हायवे रुंदीकरणात धनिकांच्या मालमत्ता वाचवताना मुळं आराखड्यात बदल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच घेतली जात असण्याची शक्यताही समोर येतेय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2015 07:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close