S M L

पंढरपुरात विठ्ठल मंदिर उद्यापासून 24 तास दर्शनासाठी खुलं

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2015 09:11 PM IST

vithal 4320 जून : अधिक महिना आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाने उद्यापासून म्हणजे रविवारपासून पंढरपुरच्या श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर भक्तांसाठी 24 तास खुले ठेवण्याचे निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे दर्शन रांगेत अनेक तास ताटकळत उभा राहणार्‍या वयोवृद्ध वारकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

रविवारपासून सुरू होणारी ही सुविधा आषाढी वारीच्या पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे या धोरणात्मक निर्णयाचा आषाढी वारीसाठी येणार्‍या वारकरी भक्तांना लाभ घेता येणार आहे.

या शिवाय आषाढीत दशमी, एकादशी व व्दादशी हे तीन दिवस ऑनलाईन दर्शन सुविधा बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण जिल्हाधिकार्‍यांनी घेतलाय. या ऐतिहासिक निर्णयामुळे भक्तांना लाडक्या सावल्या विठ्ठलाचे दर्शन सुलभ व तत्पर मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2015 09:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close