S M L

बाळासाहेबांची टीका : चाहत्यांनी केली सचिनची पाठराखण

16 नोव्हेंबर महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान असला तरी सर्वप्रथम मी भारतीय आहे, ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील साधीसरळ भावना सचिन तेंडुलकरनं व्यक्त केली. पण मराठीच्या मुद्यावर मनसेवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेनं सचिनच्या या वक्तव्याला राजकीय रंग देत विनाकारण सचिन तेंडुलकरला या वादात ओढलं. सामनामध्ये लिहीलेल्या लेखात बाळासाहेब ठाकरेंनी सचिन तेंडुलकरला इशारा दिला. बाळासाहेबांच्या या लेखावर मात्र राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सचिनवर बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रातल्या अनेकांनी प्रतिक्रिया देताना सचिनलाच पाठींबा दिला. ' सचिन, तू तुझी खेळपट्टी सांभाळ ' असा सल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सचिनला सोमवारच्या 'सामना'त पत्र लिहून दिला आहे. ' मुंबई ही कोणाची मक्तेदारी नाही. हिंदुस्थानातील सर्व लोकांचा मंुबईवर सारखाच अधिकार आहे' या वक्तव्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सचिनचे हे उद्गार ऐकून मराठी मन चिरले आहे. याची काय गरज होती का? बाकीचे सारेचजण मुंबईचा घास घेण्यासाठी अस्तन्या सावरून उभे असताना हे खतपाणी घालण्याची तुला काय गरज होती? असा प्ऱश्न विचारुन इथेच तू मराठी मनाच्या पिचवरून 'रनआऊट' झाल्याचं म्हटलं आहे. ' मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असेल. पण हे विसरू नकोस प्रथम मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मराठी माणसाच्या न्यायहक्कावर जर तू तुझ्या जिभेची बॅट करून मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारे चौकार किंवा षटकार मारशील तर मात्र मराठी माणूस ते कधीही सहन करणार नाही! असा सल्ला देत क्रिकेटच्या खेळपट्टीवर जे कमावलेस ते राजकारणाच्या खेळपट्टीवर गमावू नकोस ' असा प्रेमाचा इशारा बाळासाहेबांनी सचिनला पत्र लिहून दिला आहे. शिवसेनाप्रमुखांची हि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे असं सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. बाळासाहेबांचे उद्गार अतिशय स्वच्छ आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल बोलण्याचा पुर्ण अधिकार आहे. सचिन क्रिकेटमध्ये जेवढे महान आहेत. तेवढेच बाळासाहेब मुंबई आणि मराठीच्या मुद्यावर महान आहेत. बाळासाहेबांचा रोख अधिकारवाणीनं सल्ला देण्याचा आहे. त्याचा दुसरा अर्थ घेऊ नये अशा सारवासारव सुभाष देसाईंनी केली आहे. पण शिवसेनेला आपलाच मित्र पक्ष भाजपच्याही अप्रत्यक्ष टीकेचा सामना करावा लागला. सेलिब्रिटींवर टीका कऱण्याची तशी शिवसेनेची जुनीच सवय. पण सचिनसारख्या तमाम भारतीयांच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या सेलिब्रिटींवर बाळासाहेबांनी केलेली टीका योग्य नाही असाच सूर सर्वत्र उमटतोय. सचिनवर केलेली टीका राजकारणाने प्रेरीत असल्याची प्रतिक्रिया सामान्य लोकांनी दिली आहे. तर सचिनने अशा टीकेकडे लक्ष न देता आपल्या खेळाकडे लक्ष द्यावं असंही काहींनी म्हटलंय. सचिनचं विधान योग्य असून मुंबईतून देशासाठी विविध, जाती धर्माचे आणि भाषेचे खेळाडू खेळले आहे. अशी सचिनची पाठराखण करत तमाम चाहत्यांनी त्याच्या विधानाला एक प्रकारे पाठींबा दिला आहे. सामनातल्या या पत्रावरील प्रतिक्रिया : खासदार संजय राऊत : शिवसेनाप्रमुखांची हि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे असं सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजीव शुक्ला, बीसीसीआयचे उपाध्यक्ष: बाळासाहेब ठाकरे हे दुसरे जीना असल्याची टीका बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, यांनी केली आहे. अरुण जेटली : सचिनचं विधान योग्य असल्याचं भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटलंय. सचिनच्या विधानात काही गैर वाटत नसल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केलीय. सुभाष दसाई, गटनेते, शिवसेना : बाळासाहेबांचे उद्गार अतिशय स्वच्छ आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल बोलण्याचा पुर्ण अधिकार आहे. सचिन क्रिकेटमध्ये जेवढे महान आहेत. तेवढेच बाळासाहेब मुंबई आणि मराठीच्या मुद्यावर महान आहेत. बाळासाहेबांचा रोख अधिकारवाणीनं सल्ला देण्याचा आहे. त्याचा दुसरा अर्थ घेऊ नये अशा सारवासारव सुभाष देसाईंनी केली आहे.शशी थरूर, परराष्ट्र राज्यमंत्री : सचिनबद्दल बाळासाहेबांनी व्यक्त केलेल्या मताशी पूर्णपणे असहमत असल्याचं थरूर यांनी म्हटलं आहे.निखिल वागळे, संपादक, आयबीएन-लोकमत : बाळासाहेबांनी सचिनवर टीका करुन हिटविकेट झाले आहेत. सचिन ही देशाचाच आयकॉन नसून तो आंतरराष्ट्रीय आयकॉन आहे. सचिन जे बोलला त्यात चुकीच असं काहीच नसल्याचंही त्यांनी म्हटलं. टीका जरी सौम्य असली तरी बाळासाहेब टीका करताना कसलाही विचार करत नाहीत. मनसेवर कुरघोडी करण्यासाठी शिवसेनेने बाळासाहेबांचा वापर केला आहे. तसंच सचिनवर केलेली टीका म्हणजे थिल्लरपणा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2009 10:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2009 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close