S M L

चंद्रपूरला पावसाने झोडपले ; वीज, मोबाईल सेवा ठप्प

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2015 06:03 PM IST

चंद्रपूरला पावसाने झोडपले ; वीज, मोबाईल सेवा ठप्प

21 जून : चंद्रपूर शहरात गेल्या 12 तासांमध्ये पावसाने झोडपून काढलंय. बारा तासांत तब्बल 200 मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झालीय. शनिवारी राञी आठ वाजेपासून शहरात पावसाला सुरुवात झाली तो पावसाचा जोर आज सकाळपर्यंत कायम होता. भामरागड तालुक्याचा वीज पुरवठा तिसर्‍या दिवशीही खंडित आहे. मोबाईल आणि दूरध्वनी सेवाही बंदच आहेत.

मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये असणार्‍या घरांमध्ये पाणी शिरलं. पावसाचा जोर आता कमी आला असला तरी पावसाची रिमझिम अजुनही सुरू आहे. ईरई आणि झरपट या दोन नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. शहराबरोबर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. कोपरना आणि जिवती या दोन तालुक्यांत शंभर मिमी पावसाची नोंद झालीय. तर राजुरा, गोंडपिपरी, ब्रम्हपुरी, चिमुर तालुक्यांनाही पावसानं झोडपुन काढलंय. गडचिरोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतोय. दक्षिण भागात पन्नास पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटलाय. गोविंदगावचा पुल वाहुन गेलाय. भामरागड आलापल्ली मार्ग बंद झालाय. भामरागड तालुक्याचा वीज पुरवठा तिसर्‍या दिवशीही खंडीत आहे. मोबाईल आणि दूरद्धनी सेवाही बंदच आहेत.

तर, यवतमाळ जिल्ह्यातही शनिवार रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय. पाऊस अजूनही थांबलेला नाही. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. यवतमाळ शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचलंय. वाहनांना मोठा त्रास होतोय.  नदीकाठच्या प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2015 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close