S M L

तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली, तीन महिलांची गळा चिरून हत्या

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2015 08:13 PM IST

तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली, तीन महिलांची गळा चिरून हत्या

21 जून : सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात हिवरे गावात तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडालीये. यामध्ये तीन महिलांची हत्या करून मारेकरी फरार झाले आहेत. प्रभावती शिंदे, निशीगंधा शिंदे, सुनीता पाटील अशी हत्या करण्यात आलेल्या महिलांची नावं आहेत. कुटुंब संपवण्याच्या उद्देशाने हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हिवरे गावाच्या बाहेर शिंदेमळा आहे. आज सकाळी पानी पिण्याच्या बहाण्याने अज्ञात तिघांनी शिंदे यांच्या घरात जावून पिण्यासाठी पाणी मागितले.यावेळी पाणी देताना त्यांनी आपण वन विभागाचे अधिकारी आहे आणि मोजणीसाठी आल्याचं सांगितलं. त्यानंतर या हल्लेखोरांनी या घरातील तिघींवर हल्ला करून चाकुने गळा चिरला. प्रभावती ब्रम्हदेव शिंदे, निशा बाळासो शिंदे, सुनिता संजय पाटील या महिला गतप्राण झाल्या. घटनेनंतर पळून जाणार्‍या तिन्हीही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अधिक तपास वीटा पोलीस करत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2015 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close