S M L

रत्नागिरी : दाभोळमध्ये दरड कोसळली, 7 जण गाडले गेल्याची भीती

Samruddha Bhambure | Updated On: Jun 22, 2015 01:06 PM IST

रत्नागिरी : दाभोळमध्ये दरड कोसळली, 7 जण गाडले गेल्याची भीती

22 जून : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळमध्ये दरड कोसळली आहे. या दरडीखाली 7 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. टेमकरवाडी परिसरात ही दरड कोसळली असून दरडीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

रत्नागिरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून सततच्या पावसामुळे काल मध्यरात्री 2:30 वाजता दाभोळ मळेवाडीत दरड कोसळली आहे. अजूनपर्यंत जीवितहानीचं कोणतंही वृत्त नाही. मात्र, दरडीखाली एका घरातले 5 जण तर दुसर्‍या घरातले 2 जण असे 7 जण अडकले असल्याचा संशय आहे.

सुभाष पुरकर यांच्या घराच्या बाजूला दरड कोसळली. त्याच्या शेजारच्याच राजेंद्र हारेकर यांच्या घरातील एका खोलीवर दरड पडली. खोलीत त्यांच्या दोन मुली आणि आई झोपल्या होत्या. दरड पडल्यावर त्यांनी ओढून बाहेर काढण्यात आलं आणि ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. तर अडकल्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. पण पाऊस असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2015 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close