S M L

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 22, 2015 01:03 PM IST

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

22 जून : मुसळधार पावसाने आता बळी घ्यायला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथील मोहाची वाडी इथे घराची भिंत कोसळून 5 जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेत एकाच घरातील चारजणांचा मृत्यू झाल्याचे समजते. पहाटे साडेपाच वाजेची ही घटना आहे. किसन दिघे, सुनंदा दिघे, जाईबाई कदम, अर्चना दिघे यांचा मृत्यू झाला आहे.

सलग सुरू असणार्‍या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह रायगड परिसरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. रायगड जिल्ह्यात 24 तासातसरासरी 137 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2015 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close