S M L

बुडत्या जहाजातून 20 जणांना वाचवण्यात नौदलाला यश

Samruddha Bhambure | Updated On: Jun 22, 2015 12:27 PM IST

बुडत्या जहाजातून 20 जणांना वाचवण्यात नौदलाला यश

22 जून  : मुंबईजवळच्या समुद्रात बुडणार्‍या एका जहाजावरच्या 20 कर्मचार्‍यांची भारतीय नौसेने थरारकपणे सुटका करण्यात आली आहे. जिंदल कामाक्षी या खाजगी जहाजातून 20 कर्मचार्‍यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

वसईपासून 80 कीलोमीटर खोल आणि 40 नॉटीकल मैलावर समुद्रात जिंदाल कामाक्षी जहाजात काल रात्री काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे जहाज मध्येच बंद पडले. हे जहाज मुंबई बंदरात येत होते. पण उधाणलेल्या समुद्रात मध्येच बंद पडल्यामुळे आपत्कालीन परीस्थीती निर्माण झाली. त्यानंतर नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले. मात्र, रात्री पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.

त्यानंतर लगेचच नौसेनेनं सीकिंग हेलिकॉप्टर आणि आयएनएस मुंबई या लढाऊ विमानाच्या मदतीने जहाजातील कॅप्टनसह 20 कर्मचार्‍यांना नौदलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. या सर्व कर्मचार्‍यांना कुलाबा इथल्या INS शिक्रा या नौदलाच्या तळावर आणण्यात आलं आहे. तसंच बंद पडलेलं जहाज भरकटू नये यासाठी नौदलाने एक बोट ही तैनात केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2015 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close