S M L

ललित मोदींच्या भेटीची मारियांनी माहिती दिली नव्हती -चव्हाण

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2015 05:17 PM IST

chavan--621x41422 जून : लंडनमध्ये ललित मोदींची भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत आलेत. याबद्दल मारिया यांनी आपल्याला कोणतीच माहिती दिली नव्हती, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

याबद्दलची कोणतीही अधिकृत कागदपत्रं आपल्याला मिळाली नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. त्यावेळच्या गृहमंत्र्यांनीही आपल्याला याबद्दलची माहिती दिली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, ललित मोदींच्या भेटीचे तपशील देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारियांना दिलेत. याबाबातचा अहवाल लवकरच देणार असल्याचं मारिया यांनी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2015 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close