S M L

मुंबईच्या नालेसफाईवरून शिवसेना-भाजप आमने सामने

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2015 06:30 PM IST

मुंबईच्या नालेसफाईवरून शिवसेना-भाजप आमने सामने

22 जून : मागील आठवड्यात पहिल्याच पावसात मंुबई तुंबल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. पालिकेनं नालेसफाईचा केलेला दाव साफ खोटा ठरला. आता नालेसफाईवरून शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपने एका प्रकारे सेनेचा इशाराच दिलाय. नालेसफाईची महानगरपालिका स्तरावर चौकशी करा, नाहीतर राज्यस्तरावर चौकशी करावी लागेल असा जाहीर इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलाय.

या वर्षीच्या पहिल्याच पावसाने मुंबई ठप्प झाल्यावर मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ नालेसफाईबद्दल सर्वसामान्यांनी राग व्यक्त केला होता. त्यातच आता पालिकेमधल्या सत्तेतला भागीदार भाजपने या मुद्द्यावर शिवसेनेला इशारा दिला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईच्या नालेसफाईची महानगरपालिका स्तरावर चौकशी करण्याची मागणी केलीये.

याबाबत भाजप महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर अंदाजे 49 टक्के भाग सांडपाणी यंत्रणेने जोडलेला नाही. नालेसफाईच्या कामाची चौकशी ही महानगरपालिकेच्या स्तरावर करा नाहीतर आम्हाला राज्य सरकारला ही चौकशी करायला सांगावं लागेल असा इशाराही आशिष शेलार यांनी दिलेला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2015 06:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close