S M L

आता खुनाचा गुन्हा कुणावर दाखल करायचा ?-पवार

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2015 11:20 PM IST

ajit_pawar_vs_cmfadanvis22 जून : मालवणी विषारी दारु प्रकरणाला सरकारच जबाबदार आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आमची सत्ता असताना काही घडलं की राजीनामा मागितला जायचा, आता 302 कोणावर लावणार असा खडासवालही अजित पवारांनी उपस्थित केलाय. एकाप्रकारे अजित पवारांनी मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला.

दरम्यान, मालवणी विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा आता 102 झालाय. अजूनही मृतांच्या आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येते. या प्रकरणी अटक केलेल्या 7 आरोपींना किला कोर्टात हजर केलं असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांची तीन पथकं कर्नाटकातल्या हुबळी, गुजराजमधील वापी आणि औरंगाबादला रवाना झालीयेत. पण,या प्रकरणातले मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत.

तसंच या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2015 11:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close