S M L

ओव्हरहेड वायरचा बिघाड दुरूस्त, वेळापत्रक मात्र कोलमडलेलंच

Samruddha Bhambure | Updated On: Jun 23, 2015 01:07 PM IST

ओव्हरहेड वायरचा बिघाड दुरूस्त, वेळापत्रक मात्र कोलमडलेलंच

23 जून : मध्य रेल्वे मार्गावर दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक जवळपास दोन तास खोळंबली होती. ओव्हरहेड वायर दुरूस्तीचे काम झालं असलं तरी वाहतूक मात्र धीम्या गतीनेच सुरू आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूकही 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे. त्यामुळे एकीकडे जोरदार पाऊस आणि दुसरीकडे मध्य रेल्वेचा खोळंबल्यामुळे चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.

काल पावसाने एक दिवसाचा आराम घेतल्यानंतर मध्यरात्रीपासून पुन्हा जोरात बरसण्यास सुरुवात केलेली आहे. सकाळी साडेचार वाजल्यापासून पावसाने मुंबईसह कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई त्याचबरोबर सर्व उपनगरांमध्ये हजेरी लावली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची लाईफ लाईन पूर्णत: ठप्प झाली होती. आज मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून काही ठिकाणी पाणीही साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तिनही मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. तसंच रस्त्यावरच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2015 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close