S M L

माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

Samruddha Bhambure | Updated On: Jun 23, 2015 12:24 PM IST

माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

malshej darad

22 जून : माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळली. त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

दरड कोसळ्याने अहमदनगर- कल्याण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे, मुरबाडच्या दिशेने जाणारी वाहतूक म्हासामार्गे, तर नगरकडे जाणारी वाहतूक आळेफाटामार्गे वळवण्यात आली आहे. तहसीलदार आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल असून घाट मोकळा होण्यास 4 तासांपेक्षा अधिक वेळ लागणार आहे.

प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरू असून, लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. यामुळे वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2015 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close