S M L

अहमदनगरमध्ये आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2015 05:31 PM IST

CrimeScene223 जून : अहमदनगरमध्ये आरटीआय कार्यकर्ते मिलिंद मोबारकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले आणि बांधकाम व्यावसायिक नजीर शेख यांच्या गुंडानी हल्ला केल्याचा आरोप मोबारकर यांनी केलाय.

आज (मंगळवारी)सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान वाडीयापार्क परिसरात मोबारकर यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अहमदनगरच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नगर शहरात दिवसाढवळ्या आरटीआय कार्यकर्ते मिलिंद मोबारकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले आणि बांधकाम व्यावसायिक नजीर शेख यांच्या गुंडानी हल्ला केल्याचा आरोप मोबरकरांनी केलाय.

मोबरकर हे लॉटरी विक्रेता अशोक लांडे हत्या प्रकरणातील साक्षीदार आहेत. या हत्या प्रकरणी कर्डीलेंचे व्याही काँग्रेसचे तत्कालीन नेते भानुदास कोतकर कारागृहात असून कर्डीलेंनी सुद्धा जेलची हवा खाली आहे. त्यामुळं या प्रकरणी पूर्वीही कर्डीलेंनी धमकावल्याचा आरोप मोबरकरांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेतली असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2015 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close